Marathi Post!

by Gilbert Keith

नमस्कार मंडळी!
तुम्हाला माझं मराठी टायपिंग बघून फार आनंद होत असेल. मी आज-काल फार वेग-वेगळ्या “टेक्नोलोजी” चा उपयोग करतोय आणि माझी दिनचर्या फार उत्साही बनली आहे. मी ठरवलंय कि मी आता पासून वरचेवर मराठीत ब्लॉग लिहित जाईन.
गुगल नि आपल्या सारख्या सामान्य माणसां साठी चांगली व्यवस्था केली आहे. आता पासून, जर भाऊ आजोबांना आम्हाला मराठी मध्ये पत्र लिहायचं असेल तर त्यांना पेपरावर लिहून मग “scan” करायची गरज नाही. त्यांना नुस्त गुगल मधे इंग्रजीत टायपिंग करता आल, कि पत्र आपोआप मराठी मधे लिहिला जाईल.
अर्थातच टायपिंग करणे म्हणजे काहींना मोठी अवघड गोष्ट असते. मी रोज आईला सांगतो कि तिने भर-भर टायपिंग करण शिकायला पाहिजे.
मी पण या सेमेस्टर मधे हिंदी ची “प्रोफिशियन्सी” परीक्षा देणार आहे. म्हणून मलाही आता पासून हिंदी मधे लिहायची सुरुवात केली पाहिजे. आमच्या कडे पुष्कळ हिंदी-इंग्रजी शब्दकोश आहेत. जर मला काही शब्द माहित नसतील तर मी त्या मधे त्यांचा अर्थ बघू शकतो.
गेल्या आठवड्यात आईने मला अनेक आयुर्वेदिक औषध दिले आहेत. मला वेगवेगळ्या गोळ्या खायचा फार कंटाळ येतो. शिवाय, मी जेव्हा वेब वर माहिती शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हा मलाह फक्त जाइरती किंव्हा “commercial propaganda” संबंधी माहिती दिसते. मी मराठी “ब्लोग्गेर्स” ना विनंती करतो कि त्यांनी आयुर्वेदिक औषधां बद्दल संशोधना संबंधी माहिती लिहावी, उदाहरणार्थ मंजिष्ठ, तुळस, वगैरे.
आपला,
गौतम.